सोलापुर – एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी 200 रुपयांचा दंड केला. ओवेसी यांची गाडी विनानंबर प्लेट होती. यामुळे पोलिसांकडून ओवेसींना दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहाबाहेर शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
विना नंबर प्लेटच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ओवेसींना वाहतूक शाखेने दंड ठोठावला. शासकीय विश्रामगृहावर गेल्यानंतर त्यांनी वाहतूक शाखेच्या दंडाची पावती फाडली. पक्षाचे शहराध्यक्ष फारुक शेख यांनी दोनशे रुपयांचा दंड भरला असल्याचं समोर येत आहे सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई करत ओवेसींना दणका दिला आहे. सेंट्रल मोटार विकल रुल 50/177 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कोण आहेत असदुद्दीन ओवेसी-
असदुद्दीन ओवेसी हे एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार आहेत. 2004 पासून ते हैदराबाद लोकसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. ओवेसी आपल्या धारदार भाषणासाठी ओळखले जातात. ते सातत्याने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर टीका करत असतात. अलीकडेच त्यांनी CAA आणि NRCकायद्याला विरोध दर्शवला होता