मुंबई प्रतिनिधी | राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी आज मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका विस्ताराने मांडली आहे. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. महिनाभर मुंबईत नसणार आहे. त्यामुळे मी २७ सप्टेंबर रोजी मुंबई मधील ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना माहिती देणार आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.
‘मला १९८० साली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीत अटक झाली. त्यानंतर आता कारवाईची ही दुसरी घटना आहे. ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. एक महिना निवडणूक प्रचारसाठी मी महाराष्ट्रभर जाणार आहे. त्यामुळे या काळात मी मुंबई बाहेर असेल. जर ईडीला मला संदेश पाठवायचा असेल तर मी २७ सप्टेंबर ला स्वतः जाईल आणि ईडीचा काही पाहुणचार असेल तो देखील घेईल,’ असे शरद पवार म्हणाले आहेत.
तर सरकार सूड बुद्धीने हि कारवाही करत आहे अशी टीका विरोधक करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. उच्च न्यायायलाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. म्हणून गुन्हा दाखल केला आहे. राज्यात पुन्हा आमचेच सरकार येणार आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय जाणकार व्यक्तीला ते विचारले तर तो व्यक्ती यासंदर्भात सांगेल. विरोधक या प्रकरणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.