महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | विधान सभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पावसाच्या सरी बरोबर राजकीय आरोपप्रत्यारोपाच्या सरी देखील बरसू लागल्या आहेत. अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते दत्त साने यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर घणाघात केला आहे. आपण महेश लांडगेंना जोपर्यंत पराभूत करत नाही तोपर्यंत शेंडीची गाठच बांधणार नाही अशी भिष्यप्रतिज्ञा दत्त साने यांनी केली आहे.

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

महेश लांडगे यांना पराभूत करण्यासाठी दत्त साने यांनी राष्ट्रवादीकडे अर्ज करून उमेदवारी मागितली आहे. तसेच त्यांचे मतदारसंघात चांगले वलय देखील आहे. २०१४ साली महेश लांडगे अपक्ष उभा राहिले असता त्यांचे काम करून त्यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका दत्ता साने यांनी बजावले असल्याचे बोलले जाते. मात्र महेश लांडगे यांनी याची जाणीव ठेवली नाही. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीचा जुना रस्ता कायम ठेवत महानगर पालिकेत आपला दबदबा कायम ठेवला.

महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघाचा ग्रामीण भाग आजपर्यंत अविकसित ठेवला आहे. त्यामुळे आता त्यांच्यातील प्रतिनिधी विधानसभेवर जावा अशी ग्रामीण भागाची भुमेका आहे. त्यामुळे पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्यास महेश लांडगे यांचा आपण पराभव करू असा विश्वास दत्ता साने यांनी व्यक्त केला आहे. जर महेश लांडगे यांचा या निवडणुकीत विजयी झाला तरीही आपण शेंडीची गाठ बांधणार नाही. पुढील निवडणुकीत त्यांना पराभव करूनच शेंडीची गाठ बांधेल असे साने म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

उपवासाच्या दिवशी पाठवले बटर चिकन ; झोमॅटोला भरावा लागला ५५ हजार दंड

कम्युनिष्टाच्या हत्ये प्रकरणी भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांना जन्मठेप ; १५ वर्षांनी लागला निकाल

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांनी भाजपला मत देऊन दिला आमदारकीचा राजीनामा

वंचितमध्ये फूट पाडण्यात विरोधक यशस्वी ? ; लक्ष्मण मानेंची वेगळ्या गटाची घोषणा