एका महिलेला मुख्यमंत्रिपदावर बसवायचंय; ठाकरेंचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला आता राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रीपदी बसवायची आहे असं मोठं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. शिवशक्ती भीम शक्ती आणि लहू शक्ती जर एकत्र आली तर, देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. गद्दार मूठभर सुद्धा नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत, हे सध्या मी अनुभवतो आहोत. आणि आपल्याला आता एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे.

उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. आता यांना शिवाजी महाराज हा आदर्श जुना वाटायला लागलाय. आज तर एका गद्दाराची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केली गेली. जसं काय शिवरायांच्या सुटकेला भाजपनेच मदत केली असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी प्रथमच महिला मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने राज्याच्या राजकारणात चर्चाना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरेंनी विचार करूनच असं विधान केलं असेल याबाबत शंका नाही पण उद्धव ठाकरेंच्या मनातील ती महिला मुख्यमंत्री कोण ? याबाबत मात्र तर्क वितर्क लावले जात आहेत.