हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या ऐतिहासिक यशानंतर महाविकास पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये आली आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
सिल्वर ओक वर पार पडणाऱ्या या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील काँग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेटमंडळी उपस्थित राहतील. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या बैठकीबाबाबत सूचक माहिती दिली आहे . आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून 2024 विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती काय असेल? जागा वाटपाचं सूत्रं काय असेल हे ठरवलं जाईल अशी माहिती सांगितली आहे.