सातारा प्रतिनिधी | कुडाळ, ता.जावली येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचे वतीने आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनात आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधारणा विधेयक २०२० पारित करून संपूर्ण देशातील समस्त शेतकरी वर्गाला बाजार समितीतील दलालीच्या जोखडातून नियमन मुक्त केले आहे. लोकसभा व राज्यसभेत बहुमाताने पारित झालेल्या विधेयकाचे राष्ट्रपतींच्या सहीने कायद्यातही रूपांतर झालेले असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या सहकार व पणन विभागाने एका सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या याचिकेवर सुनावनी घेत सदर कायद्याच्या अंमलबजावणीस महाराष्ट्रात स्थगिती दिल्याच्या विरोधात भाजपा जावलीच्या वतिने कृषीउत्पन्न बाजार समिती कुडाळ येथे राजूय सरकारच्या या संबंधित आदेशाची चिरफाड करून निषेध करण्यात आला.
भारतातील तमाम शेतकरी वर्गास आपल्या शेतमालाच्या किमतीच्या जवळपास 8% कर बाजार समितीच्या घशात घालावा लागतो . त्यामुळे वार्षानुवर्षे बाजारसमीतीचे दलाल शेतकऱ्यांच्या शेतमालाची किंमत स्वतः ठरवून शेतकऱ्यांना पडत्या दराने शेतमाल विक्रीस भाग पाडत होते. परंतु केंद्र शासनाच्या नविन कायद्यामुळे शेतकरी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर कोणत्याही राज्यात कुठेही स्वतःचा शेतमाल हमीभावाने विकू शकतो. बाजार समितीच्या बाहेरील कोणत्याही परिसरात विकलेल्या शेतीमालास बाजार समितीला यापुढे कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. यामुळे बाजार समितीतील दलालांची पंचाईत झाली आहे.
नेमके याच मार्गाने अवैध पैसे कमावणारांचे मार्ग बंद झाल्यामुळे केंद्राने पास केलेल्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ न देण्यासाठी चुकिच्या पद्धतीने राज्यशासनाच्या आदेशाचा निषेध यावेळी करण्यात आला. तसेच हा आदेश मागे घाऊन रद्द न केल्यास यापुढे तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष रमेश तरडे , तालुका उपाध्यक्ष जितेंद्र पवार, भानुदास ओंबळे , श्रीमती सोनिया धनावडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशालीताई सावंत , सचिव प्रदीप बेलोशे, उद्योजक आघाडीचे तालुका संयोजक दीपकशेठ गावडे, युवती मोर्चाच्या अध्यक्षा मोनिकाताई परामणे , धर्मु तरडे, प्रकाश तरडे, मामा खुडे आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थितीत होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.