हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर, वाशिम, धुळे, अकोला, नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील 84 जागा आणि त्या अंतर्गत 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाले. त्यानंतर आता मतमोजणी केली जात आहे. येथील नागपूर जिल्हा परिषदेतील 16 व पंचायत समितीच्या 31 जागांसाठी पोटनिवडणूतिचे निकाल हाती येत असून या ठिकाणी पंचायत समिती गण भाजप आघाडीवर आहे तर जिल्हा परिषद गटात काँग्रेस आघाडीवर आहे.
नागपूर उमरेड पंचायत समितीत भाजपच्या मिनाक्षी कावटे 113 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर बेनोला पंचायत समितीमध्ये भाजपच्या हेमलता सातपुते ,नागपूर पंचायत समिती काँग्रेसच्या मालती वसू, अक्कलकुवा जिलहान परिषदेत काँग्रेसच्या रेहणाबेन मक्रणी विजयी झाल्या आहेत.
नागपुरात दवलामोटी गणात दवलामोटीमध्ये काँग्रेसच्या सुलोचना ढोक 10 मतांनी विजयी झाल्या आहेत. उमरेडमध्ये भाजपच्या मीनाक्षी मनोहर कावटे या 113 मतांनी विजयी झाल्या आहेत. मीनाक्षी कावटे यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला आहे. मकरधोकडा पंचायत समिती मतदारसंघात भाजपने विजयी सलामीची नोंद केली आहे.
नागपूर जिल्हा परिषद मध्ये 16 जिल्हा परिषद व 31 पंचायत समितीच्या जागेसाठी पोट निवडणूक होत आहे. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी आहे तर भाजप व शिवसेना स्वतंत्र लढत आहे. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस नेतृत्व दुग्ध व पशु संवर्धन मंत्री सुनील केदार करत आहे. भाजपचे नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळे करत आहे तर शिवसेनेचे नेतृत्व खासदार कृपाल तुमाणे करत आहे.