देशात पूर्वी लोकशाही होती, आता हुकूमशाही आहे; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील लखीमपूरलाघडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावरून काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “देशात पूर्वी लोकशाही होती. आता हुकूमशाही आहे. कोणताही राजकारणी उत्तर प्रदेशात जाऊ शकत नाही. आम्हाला मारून टाका, वाईट वागणूक द्या, त्याने काही फरक पडत नाही. आम्ही त्यावर बोलतच राहणार” असल्याचे गांधी यांनी म्हंटले आहे.

काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्याशी लखीमपूर येथील घटनेसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत आपण आज लखीमपूरला जाणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, आपल्या भारत देशात शेतकऱ्यांवर हल्ला होत आहे. त्यांनी जीपखाली चिरडले जात आहे. त्यांना दिवसा ढवळ्या मारणाऱ्या मंत्र्यांवर काहीच कारवाई केली जात नाही.

मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, “यापूर्वी त्यांची शेती हिसकावून घेतली गेली. तीन कृषी कायदे बनविण्यात आले. त्याला विरोध म्हणून आज शेतकरी आंदोलन करत आहेत. मोदी व येथील सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये होते. पण त्यांना लखीमपूरला जावेसे वाटले नाही.”

You might also like