हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या एक्शनच्या स्टाईलमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता महेश बाबू हा चांगलाच चर्चेत असतो. शिवाय त्याने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्नही केल्याने तो मराठी प्रेक्षकांच्या पसंतीचा बनला आहे. या दोघांची जोडी ही फक्त दाक्षिणात्या प्रेक्षकांच्या नाही तर संपूर्ण भारतातील प्रेक्षकांची आवडती आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. दोघांच्या लग्नाला आज 18 वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्तानं नम्रतानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
https://www.instagram.com/reel/CZyLJ3CgqdV/?utm_source=ig_web_copy_link
महेशबाबूची पत्नी नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये नम्रतानं तिचा आणि महेश बाबूचा एक कोझी फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “18 वर्षांपूर्वी आजच्या दिवस आपण घेतलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या निर्णयाला आज सेलिब्रिट करतोय. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” असे कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/p/CgrEdONvUYG/?utm_source=ig_web_copy_link
मराठमोळ्या नम्रताने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या फोटोला आता पर्यंत एक लाख पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. शिवाय नम्रताच्या पोस्टवर सेलिब्रिटींपासून त्यांच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच कमेंट केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Cod4LsTvzDx/?utm_source=ig_web_copy_link
पहिली भेट आणि 5 वर्षांनी लग्न
‘वंशी’ चित्रपटाच्या सेटवर नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची पहिली भेट झाली. त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजेच 2005 ला त्या दोघांनी लग्न केलं. यानंतर काही काळानी नम्रताने परिवाराला महत्त्व देत चित्रपटसृष्टी सोडून संसारावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. ‘प्रेमा द जर्नलिस्ट’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नम्रता शिरोडकरने चित्रपट सोडून लग्न करण्याचा निर्णय का घेतला हे सांगितले.
https://www.instagram.com/p/CoPoEeFPQoe/
नम्रताचे महेश मांजरेकरांशी होते प्रेमाचे संबंध
जेष्ठ अभिनेते महेश मांजरेकर हे नम्रता शिरोडकरच्या प्रेमात होते. नम्रता शिरोडकर आणि महेश मांजरेकर पहिल्यांदा वास्तवच्या सेटवर भेटले. त्यावेळी त्यांच्यातील मैत्री वाढत गेली. याच काळात त्यांच्यातील नात्याची चर्चा सुरू होती. वास्तवमध्ये संजय दत्तसोबत नम्रता दिसली होती. त्यावेळी मांजरेकरांचे लग्न देखील झाले होते. एका वादामुळे दोघांचे नात जास्तवेळ टिकू शकले नाही. काही दिवसांनंतर त्यांचा ब्रेकअप देखील झाला.