मोदींच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; जवानांच्या बसवर गोळीबार

ARMY
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू काश्मीर येथे दहशदवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बस वर हल्ला केला आहे. जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले मात्र यामध्ये १ जवान शाहिद झाले असून २ जवान जखमी झाले आहेत

मिळालेल्या ,माहितीनुसार, सकाळच्या शिफ्टसाठी ड्युटीवर असलेल्या 15 सीआयएसएफ जवानांच्या बसवर जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ पहाटे 4.25 वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी जवानांनी देखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत तेथून पळ काढायला लावला. मात्र या संपूर्ण चकमकीत एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले.

दरम्यान, याशिवाय दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच आहे. लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर युसूफ कंत्रू याच्यासह चार दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला आहे.