कोरोनाच्या टेस्ट मोफत करा- सुप्रीम कोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या सर्व टेस्ट मोफत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. सरकारी पाठोपाठ खाजगी प्रयोगशाळांमध्येही मोफतच टेस्ट करण्यात यावी असही सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टेस्टसाठी सरकारी प्रयोगशाळा पुरेशा नाहीत, त्यामुळे खासगी प्रयोगशाळांना सुद्धा टेस्टची परवानगी देण्यात आली आहे. सध्या खासगी प्रयोगशाळांना करोना व्हायरसच्या चाचणीसाठी ४,५०० हजार रुपये आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं कोरोना टेस्ट मोफत केल्यास सरकार खाजगी प्रयोगशाळांना नंतर भरपाई देणार का हे अजून स्पष्ट नाही आहे.

आज सुप्रीम कोर्टात कोरना टेस्टबाबतच्या याचिकेवर सुनावणीत करोनाच्या टेस्टसाठी खासगी प्रयोगशाळांना भरपाई देणे शक्य आहे का? त्याची व्यवहार्यता तपासून पाहा. हे शक्य झाल्यास नागरिकांना पैसे भरावे लागणार नाहीत, असे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस.रविंद्र भट यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. कोरोना व्हायरसच्या टेस्टसाठी खासगी प्रयोगशाळांना इतके महागडे दर आकारण्याची परवानगी देऊ नका. सरकारकडून खासगी प्रयोगशाळांना भरपाई देण्यासाठी यंत्रणा तयार करा असा सल्ला न्यायमूर्ती भूषण यांनी दिला. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेसबाइटवरील माहितीनुसार देशात सध्या करोना व्हायरसची ५१९४ प्रकरणे आहेत. सरकारी रुग्णालयांवरील भार वाढला असून तिथल्या प्रयोगशाळांमध्ये करोनाची टेस्ट करणे सर्वसामान्यांसाठी कठिण होऊन बसले आहे असे याचिकाकर्ते शशांक देव सुधी म्हणाले. ते स्वत: वकिल आहेत. लोकांसमोर पर्याय नसल्याने त्यांना जास्त पैसे मोजून खासगी प्रयोगशाळेत चाचणी करावी लागत आहे असा याचिकाकर्त्याचा मुद्दा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

 

Leave a Comment