‘या’ अभिनेत्याचं अल्पवयीन मुलींसमोर पार्कमध्ये अश्लील कृत्य; POCSO कायद्यांतर्गत पोलिसांकडून अटक

Actor Shrijit Ravi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मल्याळम अभिनेता श्रीजीत रवी याला आज केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातून पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO)  अटक करण्यात आली आहे. शाळेतील अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी श्रीजीत रवीला पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कलम 11 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आरोपी श्रीजीत रवी हा लोकप्रिय अभिनेता टीजी रवी यांचा मुलगा आहे. याअगोदरदेखील 2016 मध्ये अशाच गुन्ह्यात श्रीजीतला अटक करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी सर्वसामान्य कारणावरून गुन्हा नोंदवल्यानंतर त्याला सोडून दिले होते. श्रीजीतवर 14 आणि 9 वयोगटातील अल्पवयीन मुलींवर 4 जुलै रोजी त्रिशूरमधील एका उद्यानात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित दोन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

मुलींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व्यक्ती काळ्या रंगाच्या कारमधून आला होता. मुलींनी तक्रार केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्रिशूर पश्चिम पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. त्यांनी कारच्या क्रमांकावरून पोलिसांना आरोपीच्या घराचा पत्ता मिळाला. त्यानंतर आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर पोलिसांना ते अभिनेता श्रीजीत रवीचं घर असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला आहे.

46 वर्षीय श्रीजीत हा व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर असून त्याच्याकडे मॅनेजमेंटची पदवी आहे. श्रीजीतने मल्याळम चित्रपटसृष्टीत 2005 साली ‘मायुखम’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्याच वर्षी 100 दिवस चाललेल्या ‘चंथुपोट्टू’ चित्रपटातून त्याला मोठा ब्रेक मिळाला. ‘पुन्यालन अगरबत्तीस’ या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला 2013 मध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा SIIMA पुरस्कार मिळाला होता. श्रीजीतने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्रीजीतला पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत अटक करण्यात आल्यामुळे त्याचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार