मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उत्तर प्रदेशातील मथुराम या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका माथेफिरू तरूणानं फेसबुकवरील मैत्री तोडली म्हणून तरूणीवर तिच्या घरात घुसून हल्ला (Murder) केला आहे. या हल्ल्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाहीतर या आरोपीने तरुणीच्या आईवरही चाकूनं हल्ला (Murder) केला आणि नंतर स्वत:च्या पोटातही चाकू खुपसला. या तरुणीची आई आणि आरोपी तरुण यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील मथुराम या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. शिवम उर्फ अभी कश्यप असे या माथेफिरू आरोपी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवम लग्नाची पत्रिका देण्याच्या निमित्तानं निवृत्त सैनिक तेजवीर यांच्या घरामध्ये गेला होता. यावेळी तेजवीर यांची पत्नी सुनीता आणि त्यांची 17 वर्षांची मुलगी सोनम या दोघीच घरामध्ये होत्या. शिवमनं प्रथम सोनमला लक्ष्य केले (Murder) आणि नंतर तिच्या आलाही लक्ष्य केले. त्यानंतर शिवमनं स्वत:लाही चाकूनं भोसकून जखमी (Murder) केले. या हल्ल्यात सोनमचा जागीच मृत्यू झाला.
सोनम आणि शिवम यांची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी सोनमने शिवमबरोबर बोलण्यास नकार दिला तसेच त्याच्याशी मैत्री देखील तोडली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने हे टोकाचे पाऊल (Murder) उचलले. तरूणीच्या आईनं यावेळी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या आरोपीने तिच्या आईवरदेखील वार करत तिला जखमी (Murder) केले. आरोपी तरूण आणि त्याच्या आईची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
हे पण वाचा :
धारावीच्या वरिष्ठ पोलिसांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसोबत धरला ठेका
आम्हाला धोका असेल तर समोरच्यांनाही नाही का?; विधानपरिषद निवडणुकीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया
भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण … ; खडसेंचं मोठं विधान
मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा; भाजप नेत्याचे सूचक ट्विट
महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल