पटना : वृत्तसंस्था – एका मद्यपी आरोपीने त्याला चोरी करताना मुलीने पहिले म्हणून त्याने मुलीची हत्या करून तिचा मृतदेह स्वतःच्याच घरात गाडून ठेवला होता. या आरोपीने आपण चोरी करत असल्याचं इतर कुणाला कळू नये, यासाठी त्यानं मुलीला घरात बोलावलं, तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह स्वतःच्याच घरात पुरून टाकला.
अशा प्रकारे केला खून
बिहारमधील सुपौल भागात राहणारा मोहम्मद राशिद दारुच्या नशेत स्वतःच्याच घरात चोरी करत होता. त्यावेळी गल्लीतून चाललेल्या आणि शेजारी राहणाऱ्या 6 वर्षांच्या सानियाने ही गोष्ट पाहिली. त्यामुळे संतापलेल्या मोहम्मदने सानियाला घरात ओढून घेतले आणि तिची निर्दयीपणे गळा दाबून हत्या केली. निष्पाण सानियाला काही समजायच्या आतच तिचा जीव गेला. आपला दोष काय, हेदेखील कळण्याच्या आत नराधम मोहम्मदने तिचा जीव घेतला. यानंतर त्याने आपला गुन्हा लपवण्यासाठी स्वतःच्याच घरात सानियाचा मृतदेह पुरून टाकला.
असा झाला खुलासा
रात्र होऊनदेखील मुलगी घरी न आल्यामुळे सानियाच्या आईवडिलांनी तिची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. यानंतर त्यांनी पोलिसांत सानिया गायब झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरु केली. शोध घेत असताना जेव्हा पोलीस आणि सानियाचे वडील मोहम्मद हसन हे मोहम्मद राशिदच्या घरी आले, तेव्हा त्याच्या घरातील जमीन उकरल्याचं त्यांना दिसलं. संशय आल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी खोदकाम केले तेव्हा त्यांना सानियाचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी मोहम्मद राशिदला अटक केली. सानियाच्या कुटुंबीयांकडून मोहम्मद राशिदला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.