आता काय म्हणावे याला ! ATM मधून सॅनिटायझरचं चोरलं ( Video )

Crime Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल चोर कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. सध्या कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे. छोटे – छोटे उद्योगधंदे बंद पडले आहे. सध्या राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, हात साफ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग असा त्रिसुत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे कोरोनाकाळात लोकांना याचा फायदा होईल. पण चक्क एका चोराने एटीएममध्ये असलेली हॅण्ड सॅनिटायझरची बाटलीचं चोरली आहे. हि घटना एटीएममधल्या कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

आयपीएस आधिकारी दिपांशू काबरा यांनी त्या चोराचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी सुधरणार नाहीत असे कॅप्शन दिले आहे. दिपांशू काबरा यांनी व्हिडिओसोबत एक पोस्ट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी ”अशा मूर्खांपासून सॅनिटायझर वाचवण्यासाठी प्रत्येक एटीएममध्ये २०० – ३०० रुपयांचा पिंजरा लावाला लागला तर शेकडो कोटी रुपये यालाच लागतील. तुम्ही जर मर्यादेत राहिला असता तर हे पैसे वाचले असते. तुमच्याच भल्यासाठी वापरता आले असते.” असे लिहिले आहे.

या व्हिडीओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती एटीएममध्ये सॅनिटाझर चोरण्यासाठी आल्याचे दिसत आहे. ती व्यक्ती आपल्या एटीएम कार्डचा वापर करते पण पैसे नाही काढत. या दरम्यान त्याचे सगळे लक्ष एटीएममध्ये असणाऱ्या सॅनिटायझर बाटलीकडे आहे.