नवीन वर्षात होणार अनेक मोठे बदल, त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर कसा परिणाम होईल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. पुढील महिन्यात बदलत असलेल्या नियमांमध्ये बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडरच्या किंमतीशी संबंधित नियम हे मुख्य आहेत. चला तर मग या नियमांबद्दल जाणून घेउयात.

1. डेबिट क्रेडिट कार्डचे नियम बदलतील
तुम्हीही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर जाणून घ्या नवीन वर्षापासून ऑनलाइन कार्ड पेमेंटचे नियम बदलणार आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डची सुरक्षितता लक्षात घेऊन हे बदल करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारी 2022 पासून हा नियम लागू करणार आहे. RBI ने सर्व वेबसाइट्स आणि पेमेंट गेटवेना ऑनलाइन पेमेंट आणखी सुरक्षित करण्यासाठी आणि त्याऐवजी ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी एनक्रिप्टेड टोकन वापरण्यासाठी त्यांच्याद्वारे स्टोअर करण्यात आलेला ग्राहक डेटा काढून टाकण्यास सांगितले आहे.

2. ATM मधून पैसे काढणे महाग होईल
1 जानेवारी 2022 पासून ATM मधून पैसे काढणे आणखी महाग होणार आहे. RBI च्या नवीन नियमांनुसार, आता ग्राहकांना निश्चित मर्यादेनंतर ATM ट्रान्सझॅक्शनसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार आहे.1 जानेवारीपासून देशातील सर्व बँकांनी ATM शुल्कात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, ATM मधून प्रत्येक वेळी पैसे काढताना तुम्हाला 21 रुपये द्यावे लागतील. यासोबतच ग्राहकाला स्वतंत्रपणे GST भरावा लागेल. सध्या ही रक्कम 20 रुपये आहे, जी पुढील महिन्यापासून 21 रुपये करण्यात आली आहे.

3. पोस्ट ऑफिसशी संबंधित नियम बदलतील
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने जाहीर केले आहे की, त्यांनी 1 जानेवारी 2022 पासून शाखेतील कॅश काढणे आणि डिपॉझिट्सवरील शुल्क अपग्रेड केले आहे. नवीन नियमानुसार, 1 जानेवारी 2022 नंतर, जर IPPB खातेधारकाने निर्धारितफ्री लिमिट ओलांडल्यानंतर पैसे जमा केले किंवा काढले तर त्याला आणखी शुल्क भरावे लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक हा भारतीय पोस्टचा एक विभाग आहे, जो पोस्ट विभागाच्या मालकीचा आहे.

4. अनेक Google अ‍ॅप्सचे नियम बदलणार
पुढील महिन्यापासून Google चे अनेक नियम बदलले जात आहेत, त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. हा नवीन नियम सर्व Google सर्व्हिस जसे की Google Ads, YouTube, Google Play Store आणि इतर सशुल्क सर्व्हिसेसवर लागू होईल. तुम्ही पुढील महिन्यापासून RuPay, American Express किंवा Diners कार्ड वापरत असल्यास, तुमचे कार्ड डिटेल्स Google द्वारे सेव्ह केले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत, 1 जानेवारी 2022 पासून, तुम्हाला प्रत्येक मॅन्युअल पेमेंटसाठी कार्ड डिटेल्स एंटर करावे लागतील.

5. LPG सिलेंडरच्या किमती
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरची किंमत ठरवतात. अशा परिस्थितीत यावेळी LPG गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होते की नाही हे पाहावे लागेल.

Leave a Comment