संभाजीराजे छत्रपतींचा विषय आमच्या दृष्टीने संपला; संजय राऊतांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे काल जाहीर केले. यावरून राऊतांवर टीका केली जात असल्यामुळे आज राऊतांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीसंदर्भात पुन्हा प्रतिक्रिया दिली. “संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार होतो तसेच संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावे एवढीच आमची अपेक्षा होती, असेही राऊत यांनी म्हंटले.

सन्जय राऊत याणी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संभाजीराजेंना राजकीय पक्षाचे वावडे असण्याचे कारण नाही. कारण यापूर्वीही अनेक लोकांनी, तसेच जे राजघराण्यातील आहेत, त्यांनीदेखील राजकीय पक्षात प्रवेश केला असून राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनीही शिवसेनेच्या नावावर निवडणूक लढवावी.

वास्तविक पाहता संभाजीराजेंना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात न आल्यामुळे काहीजण काही प्रकारची वक्तव्य करत आहेत. त्यांनी या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही संभाजीराजे छत्रपतींना देण्यासाठी तयार झालो. तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

Leave a Comment