Maratha Reservation GR । मुख्यमंत्री शिंदेंकडून जरांगेंना नवा GR सुपूर्द; विजयाचा गुलालही उधळला

Maratha Reservation GR shinde jarange
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maratha Reservation GR । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारकडे ज्या मागण्या केल्या होत्या, त्या मागणीचा नवा अध्यादेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या हाताने जरांगे याना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. यावेळी एक मराठा लाख मराठा, एकनाथ शिंदे जिंदाबाद, मनोज जरांगे पाटील जिंदाबाद अशी घोषणाबाजी मराठा बांधवांकडून देण्यात आली.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीला गेले आणि मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघानींनी क्रेनच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि गिरीश महाजन हे दोन्ही मंत्रीही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांकडे आपल्या हातानी नवा GR सुपूर्द केला (Maratha Reservation GR) आणि ज्यूस पाजला. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना पेढा भरवलाविजयाचा गुलाल लावला. जरांगे पाटलांनी सुद्धा शिंदेंच्या कपाळावर गुलाल लावला. जरांगे पाटील यांना यावेळी तलवार देखील भेट देण्यात आली. यावेळी मराठा बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं.

दरम्यान, शरीर साथ देत नसताना मराठा समाजासाठी लढलोय. साडेचार महिन्यापासून आरक्षणाची लढाई सुरु होती. सगेसोयरे आरक्षणात यावे, यासाठी अध्यादेश महत्वाचा होता. आता मुख्यमंत्र्यांनी सगेसोयरेबाबत काढलेल्या अध्यादेशानंतर त्यांचे आभार मानतो. मात्र शिंदे साहेब, मराठ्यांनी उधळलेल्या या गुलालाचा अपमान होऊन देऊ नका, कुणबी नोंद असलेल्यांच्या सर्व मराठा बांधवांच्या सगेसोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या अशी विनंती यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंना केली.