Maratha Reservation : समाज म्हणून एकनाथ शिंदेंना आमचा विरोध संपला – मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation Jarange Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं असून मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मध्यरात्री उशिरा मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी सरकारचा नवा अध्यादेश मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला. यामुळे मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. यानंतर आता समाज म्हणून एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आमचा विरोध संपला आहे असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

सरकारने नवीन जीआर आणल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हंटल कि, सरकारने सगासोयऱ्यांबद्दल नवा अध्यादेश काढला आहे. राज्यातील मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. “वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणाचे (Maratha Reservation) काम केले आहे. त्यामुळे समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे’

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे उपोषण सोडणार- Maratha Reservation

मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं आहे. आंतरवली सराटी पेक्षा मोठी विजयी सभा आम्ही वाशी मध्ये घेणार आहोत असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आता काहीच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या भेटीला येतील आणि त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडण्यात येईल. त्यानंतर महाविराट सभा जरांगे पाटील घेतील आणि मराठा समाजाला संबोधित करतील.