स्वप्नील जोशीने साजरा केला लाडक्या लेकीचा वाढदिवस; आजीची पुरणपोळी ठरली गोडव्याचे कारण

0
94
Swapnil Joshi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता स्वप्निल जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक नाव आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक असे रोमँटिक, गंभीर आणि मनाला भावणारे चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. आपल्या कामाबाबत अत्यंत पॅशिनेत असणारा स्वप्नील हा त्याच्या अभिनयाइतकाच फॅमिली बाबतही गंभीर आहे. कामाव्यातिरिक्त जास्तीत जास्त वेळ तो आपल्या कुटुंबासोबत घालवतो. आता त्याच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच मायराचा वाढदिवस देखील त्याने गोड गोड सेलिब्रेट केला आहे आणि या गोड सेलिब्रेशनचा एक गोड व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CPNztP1lvFT/?utm_source=ig_web_copy_link

मायरा म्हणजे स्वप्नील जोशीची लाडूकली लेक. मायरा घरात सगळ्यांचीच लाडकी आहे. यामुळे मायराचा वाढदिवस असल्याने काल स्वप्निल आणि त्याच्या आईने म्हणजेच तिच्या आज्जीने तिला गोड भेटवस्तू दिली आहे. ही भेटवस्तू नावाइतकीच गोड गोड, खमंग आणि चविष्ट आहे. ती म्हणजे अस्सल साजूक तुपाच्या धारेवर घसरणारी आणि तेही आजीच्या हातची गरमागरम ‘पुरणपोळी’. ही चविष्ट पुरणपोळी खाऊन मायराही खूप खूश झाली. एवढंच नव्हे तर शेवटी ती आजीला धन्यवाद देते. स्वप्निलने त्याच्या सोशल मिडियावर हा आज्जी आणि नातीच्या नात्यातला गोडवा एका व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवला आहे.

https://www.instagram.com/p/CNfCF3KlrJI/?utm_source=ig_web_copy_link

स्वप्निलने कोणताही भरीव, धांगड धिंगा करणारा व महागडा असा वाढदिवस न करता असा लाखमोलाचे जगातील सुंदर नात जपणारा असा वाढदिवस साजरा केल्याने त्याला अनेक लोकांनी छान छान प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मायराच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी तिला भरूभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. अनेक सेलिब्रटींनीही या व्हिडिओवर कमेंट करून मायराला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्निलला मायरा आणि राघव अशी दोन मुले आहेत. मायरा मोठी, तर राघव लहान आहे. स्वप्नील या दोघांचेही फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो.

https://www.instagram.com/p/CM_bIHflOBb/?utm_source=ig_web_copy_link

स्वप्निल सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात गेस्ट म्हणून दिसतोय. याशिवाय त्याचा बहूचर्चित ‘बळी’ हा आगामी चित्रपट लवकरच येणार आहे. सोबतच ‘समांतर २’ या गुढदायक वेबसीरिजमध्येही तो दिसणार आहे. ‘समांतर’चे पहिले पर्व अत्यंत लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे आता दुसऱ्या पर्वात काय घडणार आणि पुढे शेवट कसा असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक अत्यंत उत्सुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here