हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुजूकी (Maruti Suzuki Car Price) ने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने कंपनीने गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत.मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत दोन डीलरशिप अंतर्गत आपली वाहने विकते. यामध्ये कंपनीने एरिना डीलरशिप अंतर्गत विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. यंदा दुसऱ्यांदा मारुती सुजूकी ने आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत.
एरिना डीलरशिपद्वारे, मारुती सुजूकी (Maruti Suzuki Car Price) कंपनी भारतीय बाजारपेठेत आपल्या 9 कारची विक्री विकते. मारुती सुझुकी अल्टो, मारुती सुझुकी वॅगनआर, मारुती सुझुकी एस-प्रेसो, मारुती सुझुकी सेलेरियो, मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती सुझुकी एर्टिगा, मारुती सुझुकी विटारा ब्रिझा, मारुती सुझुकी इको आणि मारुती सुझुकी डी सुझुकी अशी या 9 कारची नावे आहेत. आज आपण कंपनीकडून एरिना डीलरशिपद्वारे विकल्या सर्व 9 वाहनांच्या नवीन किमतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
गाडीचे नाव | एक्स-शोरूम किंमत | टॉप व्हेरियंटची किंमत | |
मारुती सुझुकी अल्टो | 4.08 लाख | 5.03 लाख | |
मारुती सुझुकी एस-प्रेसो: | 3,99 लाख | 5.64 लाख | |
मारुती सुझुकी सेलेरियो: | 5.25 लाख | 7 लाख | |
मारुती सुझुकी इको: | 4,63 लाख | 5,94 लाख | |
मारुती सुझुकी वॅगनआर | 5,47 लाख | 7,08 लाख | |
मारुती सुझुकी स्विफ्ट: | 5.92 लाख | 8.71 लाख | |
मारुती सुझुकी डिझायर | 6.24 लाख | 9,17 लाख | |
मारुती सुझुकी विटारा ब्रेझा | 7.84 लाख | 11.33 लाख | |
मारुती सुझुकी अर्टिगा | 8.35 लाख | 12.79 लाख |
अनेक कंपन्यांनी वाढवल्या गाड्यांच्या किमती – (Maruti Suzuki Car Price)
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून गाड्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. महिंद्रा, टोयोटा, मर्सिडीज, ऑडी आणि इतर काही कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्क मध्ये वाढ झाल्याने गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय कंपन्यांना घ्यावा लागला आहे. टाटा मोटर्सनेही आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता मारुती सुझुकीने (Maruti Suzuki Car Price) आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत.
अधिकृत वेबसाईट – https://www.marutisuzuki.com/
हे पण वाचा :
हे पण वाचा : Kia Carens CNG: कियाची कॅरेन्स लवकरच येणार सीएनजी मध्ये; Ertiga ला देणार तगडी फाईट
हे पण वाचा : Maruti Suzuki लवकरच लाँच करणार ‘ही’ दमदार कार; Kia Carens ला देणार टक्कर?
Credit Card : 1 जुलैपासून RBI बदलणार क्रेडिट कार्डचे नियम; आता ग्राहकांना मिळणार ‘हे’ विशेष अधिकार
Mahindra Bolero : दमदार इंजिन अन् ड्युअल एअरबॅगची सिस्टीम; महिंद्राची नवी बुलेरो पहाच….