हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील उल्हासनगर भागात असणाऱ्या सेंच्युरी कंपनीमध्ये आज (शनिवारी) दुपारी भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व कामगारांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अद्याप या स्फोटाचे मुख्य कारण समोर आलेले नाही.
शनिवारी दुपारी स्फोट झाल्यावेळी सेंच्युरी कंपनीमध्ये अनेक कामगार काम करीत होते. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यांचा हादरा तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी परिसरातील घरांना देखील बसला. मुख्य म्हणजे, या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर पाच कामगार जखमी झाले आहेत. तसेच, इतर कामगारांना सुरक्षितपणे कंपनीच्या बाहेर काढण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सेंच्युरी कंपनीमध्ये नायट्रोजन गॅसचा कंटेनर सेंच्युरी कंपनीत आणण्यात आला होता. त्यात CS2 फील करणार होते. मात्र त्याची चेकिंग सुरुवात असताना हा भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज येताच परिसरात खळबळ माजली. तसेच आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले. ज्यामुळे कंपनीच्या परिसरात गोंधळ उडाला. यानंतर तातडीने मदत यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी निर्माण झालेल्या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
सध्या, दुर्घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली असून त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आणि पत्रकारांनीही घटनास्थळी गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या स्फोटानंतर घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.