हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मुंबई – मुंबईतील लोअर परळ परिसर आणि करी रोड परिसराच्या आवारात असणारा बहुमजली टॉवर वन अविघ्न पार्कमध्ये अत्यंत भीषण आग लागली आहे. अविघ्ना टॉवर हा एकूण साठ मजली इमारतीचा असून याच्या १९ व्या मजल्यावर हि भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हि घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून अद्याप आग लागण्याचे नेमके कारण काय ते स्पष्ट झालेले नाही. तूर्तास हि आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे रहिवाश्यांकडून सांगितले जात आहे.
Fire broke out at the multi-storey Avighna park apartment on Curry Road, around 12 noon today. No injuries reported. pic.twitter.com/W9KqsQLkPr
— ANI (@ANI) October 22, 2021
दरम्यान परिसरात आगीचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सध्या भायखळा फायर ब्रिगेड, दादर फायर ब्रिगेड आणि वरळी फायर ब्रिगेड येथून एक दोन नव्हे तर १५ गाड्या बोलावण्यात आल्या आहेत. घटनास्थळी दाखल झालेली हि पथके आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान घटनेची पाहणी करण्याकरिता मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आमदार अजय चौधरीदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Mumbai | One person injured in fire at Avighna Park apartments, Curry Road: Fire Department
Mayor Kishori Pednekar arrives at the incident site pic.twitter.com/DRvGRTU4fv
— ANI (@ANI) October 22, 2021
मिळालेल्या माहितीनुसार हि आग १९ व्या मजल्यावरून आता २५ व्या मजल्यापर्यंत पसरलेली आहे. अग्निशमन दलाचे पथक इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न करीत आहेत. तरीही अद्याप अनेक जण इमारतीत अडकल्याची बातमी मिळत आहे. याशिवाय इमारतीतून रेस्क्यू झालेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसत असून काही जण जखमी झाले आहेत. अजूनही हि आग विझलेली नसून धुराच्या लोटांमुळे सर्वत्र परिसर सदृश नसल्याचे दिसत आहे. दरम्यान आपला जीव वाचविण्यासाठी एका व्यक्तीने बाल्कनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता उंचावरून खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.