मुंबईतील फॅशन स्ट्रीट परिसरात भीषण आग; अनेक दुकाने उध्वस्त

mumbai fasion street fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथील दुकानांना आग लागल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

दुपारी १ वाजताच्या सुमारास फॅशन स्ट्रीट परिसरातील १० ते १२ दुकानांना ही भीषण आग लागली. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा परिसर तत्काळ निर्मनुष्य करण्यात आला. त्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत काही दुकानामधील साहित्य जळून खाक झाले आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्या आहेत. पाण्याच्या फवाऱ्याने आग विजवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अजून स्पष्टता समोर आलेली नाही मात्र पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.