तर मग मराठ्यांना नेता कसा मिळणार?; नरेंद्र पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर आतापर्यंत निशाणा साधला जात होता. मात्र, आता आरक्षणाच्या मुद्यांवरून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी खासदार संभाजी छत्रपती यांना सवाल केला आहे. “जे लोक मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चळवळ करत आहेत. चळवळीचे नेते आहेत. ज्यांच्याकडून समाजाची अपेक्षा आहे. असे नेतेच जर सरकारशी सहमत होत असतील तर मराठ्यांना नेता कसा मिळणार?, असा सवाल पाटील यांनी केला आहे.”

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यात आला होता. अनेकवेळा आंदोलनही करण्यात आले. सध्या आरक्षणाच्या मुद्यांवरून माथाडी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी माध्यमांशी पुणे येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी सवालही उपस्थित केले.

यावेळी पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारच्या चांगल्या कामाचे संभाजीराजेंनीच कौतुक केले. कोल्हापूरला सारथीचं केंद्र, नाशिकला सारथीचं केंद्र होणार होते. त्याचं पुढे काय झालं माहिती नाही. तरीही छत्रपती संभाजीराजे महाविकास आघाडीशी सहमत आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी उभ्या केलेल्या चळवळीचे नेतृत्व करणारे लोकच आता सरकारशी सहमत आहेत तर मराठ्यांना नेता मिळणार कसा? हा प्रश्न पडतो.