Pan Card वरील क्रमांकाचा अर्थ काय आहे ??? घरबसल्या अशा प्रकारे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pan Card हे आर्थिक कामांसाठीचे एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. याशिवाय आता अनेक कामे करणे अशक्य बनले आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी देखील पॅनकार्ड देणे महत्वाचे आहे. तसेच पॅन क्रमांकाशिवाय 50,000 रुपयांच्या वरचे व्यवहारही करता येत नाहीत. पण आपल्याला पॅन कार्डवर नोंदवलेल्या 10 अंकी क्रमांकाविषयीची माहिती आहे का ??? हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून देशभरातील नागरिकांना पॅन कार्ड जारी केले जाते. ज्याला परमनंट अकाउंट नंबर असेही म्हणतात.

What is Pan Card: Eligibility, How to Apply, Documents Required etc.

पॅन कार्डचे किती प्रकार आहेत ???

Pan Card चे दोन प्रकार आहेत. ते बनवण्यासाठी फॉर्म क्रमांक 49A भरावा लागतो. हे जाणून घ्या कि, परदेशी नागरिकांनाही पॅनकार्ड मिळू शकते, मात्र त्यासाठी त्यांना फॉर्म क्रमांक 49AA भरावा लागेल. त्याच बरोबर कोणत्याही कंपनीच्या नावाने व्यवहार करण्यासाठी एक स्वतंत्र पॅनकार्डही बनवण्यात येते. ज्याला बिझनेस पॅन कार्ड असे म्हंटले जाते. अल्पवयीन तरुण किंवा विद्यार्थ्यांना देखील पॅन कार्ड बनवता येते. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन फॉर्म भरावा लागेल.

PAN Card Meaning | PAN number meaning | PAN Card 10 Digit meaning |

Pan Card वर नोंदवलेल्या 10 अंकांचा अर्थ काय ???

हे लक्षात घ्या कि, पॅन कार्डवर एकूण 10 अंक आणि अक्षरे असतात. त्यामध्ये सुरुवातीला नेहमी 5 अक्षरे असतात. यानंतर त्यात चार अंक आणि शेवटी एक अक्षर असते. या सर्व संख्या आणि अक्षरांचे वेगवेगळे अर्थ आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, चौथ्या अक्षराद्वारे याची माहिती कळते. यातील P म्हणजे इंडिव्हिज्युअल. त्याचप्रमाणे C – कंपनी, H – हिंदू अविभक्त, A – युनियन ऑफ पीपल, B – बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, T – ट्रस्ट, L – Local Authority, F – फर्म, G – सरकारी संस्था, J – ज्यूडिशियल.

PAN Card Fees | Paytm Blog

पॅन नंबरमध्ये लपले आहे नाव

Pan Card नंबर मधील पाचवे अक्षर हे आपल्या आडनावाचे पहिले अक्षर आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याचे नाव बल्लू कुमार असेल तर पाचवे अक्षर K असेल. यानंतर 4 रॅन्डम नंबर आहेत. शेवटी एक अल्फाबेट आहे. पॅनकार्डवरून आपल्याला कर्जाची माहिती मिळते. इतर बँकांमध्ये खाते नसलेल्या पॅन नंबर बाबत बँक अधिकारी अगदी सहजपणे शोधू शकतात. पॅन नंबर द्वारे आपल्याला क्रेडिट स्कोअर देखील तपासता येतो.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/tutorials/1.permanent%20account%20number%20(pan).pdf

हे पण वाचा :
Prepaid Plans : ‘या’ प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसोबत मिळवा Disney + Hotstar फ्री सबस्क्रिप्शन
Unity Small Finance Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! स्पेशल FD वर मिळेल 8.3% व्याज
NPS Scheme च्या ई-नॉमिनेशन प्रक्रियेत मोठा बदल, खातेदारांवर काय परिणाम होईल ते पहा
LPG Price : कमर्शिअल गॅस सिलेंडर 115 रुपयांनी झाला स्वस्त, नवीन दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर तपासा