मुंबई | अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाची चेंबूर मुंबई येथील नालंदा हॉलमध्ये अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांच्या उपस्थितीत महासभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अन्न व औषध प्रशासनाच्या एकूण कार्यपद्धतीवरती आक्षेप घेत अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी व व्यापारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात पुर्ण देशात स्थायिक पातळीवर संबंधित व्यापारी आंदोलन करणार आहेत. तसेच उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याचे अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी महासभेला कैटचे वरिष्ठ अध्यक्ष महेश बखाई, महाराष्ट्र डेअरी उत्पादक वितरक असोसिएशनचे अध्यक्ष केवलचंद जैन,नंदकुमार हेगिष्टे, अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सोहन जैन, सुनिल गुंडे व महासंघाचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते