व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे गटाला मोठा धक्का ! युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

पुणे : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करत अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. यानंतर आता शिवसेनेची यंग ब्रिगेडही नाराज असल्याचे समोर आले आहे. कारण आता युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. युवती सेना सहसचिव शर्मिला येवले (sharmila yevale) यांनी आपल्या समर्थकांसह युवती सेनेचा राजीनामा दिला आहे.

पक्षात मागच्या काही दिवसांपासून जे सुरु आहे त्यामुळं युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सोडणं मात्र पदाधिकारी राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. पक्षावर नाराज झाल्यामुळे 35 पदाधिकारी युवतीसेना पदाचा राजीनामा देत आहोत, असं शर्मिला येवले (sharmila yevale) यांनी सांगितले आहे. यानंतर युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वरुण सरदेसाई यांचा फोन आला असून त्यांना मुंबईत भेटीसाठी बोलावलं आहे.

महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातूनही पदाधिकारी राजीनामा देणार आहे. शहर, तालुका, जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या तरूणी नाराज आहेत. तरूणी, महिला यांचा राजकारणातील वावर कमी आहे. सध्या ग्रामीण भागातही तरूणी पुढे येत आहेत. राजकारणात सक्रीय होत आहेत. ही चांगली आहे. पण नेतृत्व करताना स्थानिक पातळीवरील महिला-तरूणींना होणार त्रास लक्षात घेतला पाहिजे.पक्षातील वरिष्ठ नेते याची दखल घेत नसल्यामुळे युवा नेत्यांमध्ये सध्या नाराजी आहे. असं म्हणत शर्मिला (sharmila yevale) यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. शर्मिला येवले (sharmila yevale) या नीलम गोऱ्हे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. शर्मिला येवले यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!