हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज दुपारी बैठक होणार होरी. मात्र, एका कारणामुळे त्यांची होणारी रद्द झाली. अचानकपणे रद्द झालेल्या बैठकीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. दोघांच्या बैठक रद्द का झाली? यामागचे नेमके कारण काय? याबाबत दोघांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
मुंबईतील फोर सिझन हॅाटेलमध्ये आज दुपारी 12 वाजता ठाकरे व आंबेडकर यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात देखील चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे या बैठकीकडे राजकीयदृष्ट्या खूप महत्व प्राप्त झाले होते. मात्र, त्यांची हि बाइतकं अचानक रद्द झाली.
अचानकपणे मुंबईतील बैठक रद्द झाल्याने आता पुढील बैठक कधी होणार? होणार की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अचानकपणे बैठक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.