हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. पुण्यात मनसे कडून 3500 राजदूत नेमण्यात येणार आहेत.
दर एक हजार मतदारामागे एक राजदूत अशी नेमणूक करण्यात येणार आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. राजदूतांच्या नेमणुकीनंतर पुण्यात ठाकरे यांचा भव्य मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांना ED चे समन्स; नेमकं काय आहे प्रकरण?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/xmtQrfQswg#hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 2, 2022
दरम्यान, येत्या काही दिवसात अनेक महापालिका निवडणूका होणार आहेत. राज्यात शिंदे गट आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळेल. मनसेने मात्र या सर्व निवडणुकीत एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीत मनसेला किती यश मिळत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे आहे.