हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले असून तो सर्वांनी पहावा असे म्हंटले. त्याच्या विधानानंतर आता देशात या चित्रपटावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात पीडीपीच्या प्रमुख नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी या चित्रपटावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. “‘द कश्मीर फाइल्स’द्वारे केंद्र सरकारकडून काश्मिरी पंडितांच्या दु:खाला हत्यार बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मुक्ती यांनी केला आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ वरून ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुक्ती यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “ज्या पद्धतीने भारत सरकार आक्रमकपणे द कश्मीर फाइल्स चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.
The manner in which GOI is aggressively promoting Kashmir Files & is weaponising pain of Kashmiri Pandits makes their ill intention obvious. Instead of healing old wounds & creating a conducive atmosphere between the two communities, they are deliberately tearing them apart.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) March 16, 2022
काश्मिरी पंडितांच्या दु:खला शस्त्र म्हणून वापरत आहे त्यावरुन त्यांचा हेतू स्पष्ट आहे. जुन्या जखमा भरण्याऐवजी ते दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करतायत. ते मुद्दाम दोन्ही समाजांना दूर करतायत,” असे मुफ्ती यांनी म्हंटले आहे.