हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री आणि फेअर अँड लव्हली जाहीरात फेम यामी गौतम हिने ४ जून २०२१ रोजी उरी चित्रपट निर्माता आदित्य धर याच्यासोबत गौप्य पद्धतीने विवाह केला. यानंतर तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली होती. आता या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामीने तिच्या विवाह सोहळ्यातील प्रत्येक आठवणींचे फोटो शेअर केले आहेत. अगदी हळदीपासून ते वरमाला गळ्यात घालण्यापर्यंतचे सगळेच फोटो तिने ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या फोटोसह यामीने आठवणी आयुष्यभरासाठी असे कॅप्शन दिलं आहे.
Memories for a lifetime ❤️ pic.twitter.com/qiwjTIZ9LG
— Yami Gautam Dhar (@yamigautam) June 6, 2021
राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे अगदी १८ लोकांच्या उपस्थितीत यामी आणि आदित्यने लग्नगाठ बांधली. हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे यामीचा हा विवाहसोहळा पार पडला. यामीचा पती आदित्य धर हा एक दिग्दर्शक असून एक गीतकारही आहे. आदित्यने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या लोकप्रिय चित्रपटाचे त्याने उत्तमरीत्या दिग्दर्शन केले आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात यमीने मुख्य भूमिका साकारली होती. यमीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते दोघेही अतिशय आनंदी दिसत आहेत. तर नववधूच्या रूपात दिसणारी यामी खूपच गोड दिसत आहे. साडी, सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या परिधान केलेली यामी अगदी खुललेल्या कळीप्रमाणे दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CPsp473JHVl/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री यामी गौतम आणि दिगदर्शक आदित्य धार या दोघांनीही आपले प्रेमाचे नाते सगळ्यांपासून लपवून ठेवलं लपवून ठेवले होते. दोघांचेही एकमेकांवर अतोनात प्रेम आहे ह्याची दोघांनी जराही कुणाला भनक लागू दिली नाही. खरंतर यामी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माध्यमांमध्ये कधीच फारशी बोलत नाही. यामुळेच तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी नेहमी गुपितच असतात. या कारणामुळे यामी आणि आदित्यच्या लग्नाची बातमी समोर येताच केवळ चाहतेच नव्हे तर इंडस्ट्रीतील सेलेब्रिटींनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र हा धक्का आनंददायी होता इतकचं.