MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या 4082 घरांच्या सोडतीचा निकाल आज होणार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर मुंबईतील म्हाडाच्या (MHADA Lottery 2023) घरांच्या सोडतीची तारीख ठरवण्यात आली आहे. आज सोमवारी (14 ऑगस्ट) दुपारी ठीक 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकूण 4 हजार 82 घरांसाठी सोडत निघेल. तब्बल चार वर्षांनी मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत काढल्याने त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आज नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणाऱ्या सोडतीच्या कार्यक्रमात एक लाख 20 हजार 144 अर्जदार सहभागी होणार आहेत.

20 हजार लोकांनी केला होता अर्ज – MHADA Lottery 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडत कार्यक्रमासाठी वेळ मिळत नसल्यामुळे सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. तसेच यामुळे सोडतीचा निकाल देखील रखडला गेला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वेळेचे नियोजन करून हा सोडतीचा कार्यक्रम येत्या १४ ऑगस्ट रोजी पार पडेल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यानुसार, आज मुंबईत एकूण 4 हजार 82 घरांसाठी सोडत निघणार आहे. या 4 हजार 82 घरांसाठी 20 हजार 144 पेक्षा जास्त लोकांनी अर्ज केला होता. त्यामुळे या सोडतीचा निकाल कधी जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आज याच घरांच्या सोडतीचा निकाल (MHADA Lottery 2023) जाहीर होणार असल्यामुळे आजचा दिवस अर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यावर्षी म्हाडा घरांच्या सोडतीसाठी राजकीय मंत्र्यांपासून ते कलाकारांपर्यंत आणि सामान्य नागरिकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांनीच अर्ज भरला होता. यामध्ये, सात कोटीच्या घरासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा देखील समावेश होता. मुख्य म्हणजे, मध्यंतरी याच सोडतीबाबत महत्त्वाची बाब समोर आली होती. काही मंत्र्यांनी म्हाडाचे घर मिळवण्यासाठी खोटे अर्ज केल्याचे म्हाडाच्या तपासात उघडकीस आले होते. यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी देखील सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, दरवर्षी म्हाडाच्या कोणत्या ना कोणत्या मंडळांच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात (MHADA Lottery 2023) येते. यावर्षीच्या सोडतीसाठी देखील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मुख्य म्हणजे, यावर्षीपासून म्हाडाने सोडातीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केल्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ई-नोंदणी योजनेमुळे सोडत प्रक्रिया देखील सोप्पी झाली आहे. यावर्षी, ई-नोंदणीच्या माध्यमातूनच तब्बल एकूण 4 हजार 82 घरांसाठी अर्ज भरण्यात आले आहेत. यामुळेच आजच्या सोडत कार्यक्रमाने सर्वाचे लक्ष वेधले आहे.