Monday, February 6, 2023

Microsoft भारतात लवकरच सुरु करणार डेटा सेंटर, दोन अब्ज डॉलर्सची असणार गुंतवणूक

- Advertisement -

नवी दिल्ली तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट तेलंगणा सरकारबरोबर सुमारे दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून सर्वात मोठे डाटा सेंटर सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करीत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या जवळच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. जर चर्चा यशस्वी झाली तर मायक्रोसॉफ्टने अमेरिकेबाहेर केलेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक असेल. तेलंगणाचे आयटी आणि उद्योगमंत्री के.टी. रामाराव यांनी काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टच्या सिनिअर मॅनेजमेंटशी संवाद साधला.

सूत्रांनी PTI ला सांगितले की, “चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही बाबींना अंतिम स्वरूप देणे अजून बाकी नाही ज्यामध्ये गुंतवणूकीचे स्थान आणि प्रमाण यांचा समावेश आहे. ” ते म्हणाले की,”असे दिसते आहे की मायक्रोसॉफ्ट येथे डेटा सेंटर करण्यास तयार आहे, परंतु अधिकृतपणे याची खातरजमा झालेली नाही.”

- Advertisement -

राज्य आयटी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,”आयटी कंपनीने राज्य सरकारशी सुरू असलेल्या चर्चेविषयी खुलासा न करण्याची विनंती केली आहे. मायक्रोसॉफ्टच्या जनसंपर्क एजन्सीला पाठविलेल्या ईमेलला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.”