राजधानी दिल्ली मध्यरात्री भूकंपाने हादरली; केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या धक्क्यांनी दिल्ली पुन्हा हादरली. तर भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये भूकंपामुळे 6 जणांचा मृत्यू झाला.

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दोन वेळा हे धक्के जाणवल्याने अनेक जण आपल्या घरातून बाहेर आले. रात्री 2दोन वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती.

या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या मणिपूर इथं जमिनीपासून 10 किलोमीटर खोल असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर भारतात 5 तासांमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. या आधी मंगळवारी रात्री 8 वाजून 52 मिनिटांनी लखनौसहित उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल असल्याचं सांगितलं जात आहे.