बिजनोर | कोरोनामुळे सध्या देशभर संचारबंदी आहे. यामुळे अनेक कामगार आपापल्या गावाकडे परतले आहेत. आर्थिक विवंचनेतून वावरत असतानाच आता या कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर प्रदेशातील बिजनोर पासून ९० कि.मी. अतरावर एका स्थलांतरीत कुटूबातील १५ वर्षांच्या मुलीचा ट्रकचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे बिजनोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उमेश चंद असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मुळचे बरेली येथील असलेले पीडित कुटुंब देहरादून येथे कामानिमित्त वास्तव्यास होते. संचारबंदीमुळे त्यांनी देहराडूनहून गावी परतण्याचा निर्णय घेतला. हरिद्वारपर्यंत सदर स्थलांतरित कुटूंब इतर वाहनाने पोहोचले. मात्र रात्री दहा च्या सुमारास त्यांना रस्त्यावर वाहतूक नसल्याने पुढील प्रवासाकरता वाहन मिळत नव्हते. अशात एका ट्रक चालकाने त्यांना लिफ्ट दिली.
ट्रक बिजनौरमधील धामपूर शहरात पोहोचला तेव्हा ट्रक चालकाने पोलिस तपासणी चौकीकडे लक्ष वेधून घेत कामगार जोडप्यास उतरण्यास सांगितले. जर पोलिसांनी पाहिले तर ते तुम्हाला पकडतील असे सांगून तपासणी चौकीच्या पुढे मी थांबतो. तुम्ही तिथे ट्रकमध्ये बसा असे सांगत त्याने जोडप्याला खाली उतरवले. ट्रक चालकाचा उदात्त हेतू लक्षात घेऊन प्रवासी जोडपे वाहनातून खाली उतरले. मात्र संधीचा फायदा घेऊन ट्रक चालक जोडप्याच्या तीन मुलांना घेऊन पसार झाला. यामध्ये एक १५ वर्षांची मुलगी देखील होती.
शेरकोट गावाजवळ आरोपींनी 15 वर्षीय मुलीला ट्रकच्या बाहेर खेचले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा आई-वडिलांनी फोनवर संपर्क झाला. यावेळी तिने घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला.
यानंतर हे प्रवासी जोडपे धामपूरमधील पोलिसांकडे गेले. घटनेची माहिती मिळताच धामपूर पोलिसांनी जसपूरमधील पोलिसांना याबाबत माहिती दिली. आरोपींना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. पोलिसांनी अखेर आरोपीला पकडण्यात यश मिळवले आणि तिन्ही मुलांची सुटका केली. बिजनौर पोलिस अधीक्षक (एसपी) लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले की, “चंद यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली असून बुधवारी त्याची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”