Milind Deora Resign : मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम; शिंदे गटात प्रवेश करणार??

Milind Deora Resign Congress
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Milind Deora Resign । आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गांधी घराण्याचे एकनिष्ठ आणि दक्षिण मुंबई मतदारसंघाचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासूनच मिलिंद देवरा काँग्रेस सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या, अखेर आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता ते शिंदे गटात जातात का हे पाहावे लागेल.

ट्विट करत दिली माहिती – Milind Deora Resign

मिलिंद देवरा यांनी ट्विट करत काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा (Milind Deora Resign) दिला आहे. त्यांनी म्हंटल की, आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे असं ट्विट देवरा यांनी केलं.

काय आहे राजीनाम्यामागील कारण

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार आहेत. दक्षिण मुंबई हा त्यांचा बालेकिल्ला आहे. परंतु, महाविकास आघाडी मध्ये दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेसाठी सोडली जाण्याची शक्यता आहे कारण अरविंद सावंत हे तेथील विद्यमान खासदार आहेत. अशावेळी मिलिंद देवरा यांचं तिकीट कापलं जाऊ शकते आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेसला रामराम (Milind Deora Resign) ठोकल्याची चर्चा आहे.