जळगावमध्ये दूध टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

Jalgaon Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध भरत असताना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी या टँकरला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात (Accident) पाच जण जागीच ठार झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ आज पहाटे तीनच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे.

काय घडले नेमके ?
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली होती. यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असतांना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांनी दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला जोरदार धडक दिली. या अपघातात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

यानंतर अपघातात (Accident) मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांची अजून नावे समजू शकलेले नाही. या अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मुक्ताईनगर पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा 
एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

ठरलं तर! विद्यापीठात ‘या’ तारखेपासून लागणार उन्हाळी सुट्टया

नेदरलँडची महिला क्रिकेटपटू बाबेट डी लीडेने केला ‘हा’ विश्वविक्रम, MS धोनीलाही टाकले मागे

3 IPL टीमकडून खेळलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूवर गुन्हा दाखल

Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील आपल्या FD च्या व्याजदरात केली वाढ