टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड ; आव्हाडांनी भाजपला फटकारले 

0
32
jitendra avhad and uddhav thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधकांकडून सतत टीकेचे लक्ष्य बनलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे अशा शब्दांत आव्हाडांनी भाजपला फटकारले आहे.

स्वतःची पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत. त्यास सलाम, असे कौतुकाचे शब्दही मुख्यमंत्र्यांबद्दल आव्हाड यांनी काढले आहेत.

फडणवीसांनी केली होती टीका –

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काल (शुक्रवार) रात्रीच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here