Arnab Goswami Arrest : अन्वय नाईक यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणारचं – जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. अर्णव गोस्वामीच्या अटकेवर विशेषकरून भाजप ठाकरे सरकारवर कडाडून टीका करताना दिसत आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अर्णवरील कारवाईचा राज्य सरकारशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे. अशातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितले आहे. एखाद्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणं हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. असं आव्हाड म्हणाले आहेत. (Arnab Goswami Arrest : Jitendra Awhad)

ट्विटरवर ट्विट करत त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ‘ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला, देवासमान आई हिरावून नेली, अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

२०१८ साली इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत 26 मे 2020 रोजी सांगितलं होते की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.”

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment