मुंबई । राज्यातील कोरोना मृत्यू दराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजपवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीकेची तोफ डागली आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील ‘कोविड १९’ मृत्युदराची टक्केवारीच आव्हाडांनी सादर करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केला. आव्हाड यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील मृत्यूची टक्केवारीच ट्विटरवर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला.
आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, ‘गुजरातमध्ये कोविड १९ मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ६.२५ टक्के आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात हे प्रमाण अवघं ३.७३ टक्के आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना महाराष्ट्र पॅटर्न काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा,’ असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
कोविड-19 मृत्युदर :-
गुजरात : 6.25%
महाराष्ट्र : 3.73%महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो , जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना ‘महाराष्ट्र पॅटर्न’ काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 16, 2020
दरम्यान, आव्हाड यांनी यापूर्वीही कोविडच्या मृत्यूदरांसंदर्भात एक ट्विट करत भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. ‘महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्यूदर सांगा की, असं आव्हान त्यांनी महाविकास आघाडीच्या टीकाकारांना दिलं होतं. त्यानंतर आज त्यांनी स्वत:च हे तुलनात्मक आकडे जाहीर केले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे.
गुजरातचा मृत्युदर सांगा की!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 14, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”