अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची पगारवाढीबाबत मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी सुरुवातीला महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनावावरून विरोधकांवर टीका केली. त्यानंतर राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या भरती आणि मानधनवाढीबाबत मोठी घोषणा केली. “मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती केली जाणार आहे. तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत असल्याचे लोढा यांनी सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात मंत्री लोढा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांच्याबाबतीत मागील सरकारने कोणतीही कामे केली नाहीत. त्यांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यात आले नाहीत. त्यामुळं आमच्या सरकारने अंगणवाडी सेविकांना 20 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी 150 कोटी खर्च केले जाणार आहेत. मनपा क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाड्या सुरू करणार असून अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार असल्याचे लोढा यांनी म्हंटले.

दरम्यान, अंगणवाडी सेविकांना अल्प मानधन देण्याच्या घोषणेवरून व आरोपांच्या प्रश्नावर विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. विरोधकांनी सभात्याग करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे.