तर मग शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही; अब्दुल सत्तारांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देगलूर विधानसभा पोटनिवडणुक लागली असल्याने त्याचा जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे. उद्धवजींचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाही. पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही, असे सत्तार यांनी म्हंटले आहे

देगलूर विधानसभा पोटनिवडणुक लागल्याने या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दरम्यान, आज निवडणूक प्रचारासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार देगलूर येथे आले होते. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा आदेश द्यावा. मग बघाच त्यांचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाहीत. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसैनिक विरोधकांचा मुडदा पाडतील.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्यावतीने देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून ते मैदानात उतरले आहेत.