शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज तोडणी विरोधात आमदार राम सातपुते यांचे विधानसभेबाहेर आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यातला शेतकरी हा प्रचंड मोठ्या संकटात अडकला आहे, एकीकडे कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला दुसरीकडे अवकाळीने उधस्त झाला मात्र हे कमी आहे की काय म्हणून या महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवले आणि वरून जबरदस्तीची वसुली सुरू केली आहे. शेतकरी आज उध्वस्त झालेला असताना त्याला एक दमडीची मदतही या सरकारने केली नाही, उलट त्याला वाढीव वीजबिल पाठवले आणि आता पीक शेतात शेवटच्या पाण्याची वाट पाहत असताना मात्र राज्यतल्या लाखो शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज तोडणी सुरू केली आहे, शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर किमान खाजगी सावकारांसारखे तरी वागू नये असे माळशिरसचे भाजपा आमदार राम सातपुते यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आमदार राम सातपुते यांनी गळ्यात स्टार्टर व निषेधाचे बॅनर घालून व हातात मोटार घेऊन सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला, सरकारच्या निषेधाची घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.कोरोनाच्या काळात शेतकरी, व्यावसायिक बेरोजगार झाले होते त्यामुळे ते जेमतेम उपजीविका भागवत आहे आणि महाआघाडी सरकार जास्तीचे वीजबिल देऊन वसुलीसाठी तगादा लावत आहे. वरून वीज बिल कमी न करता त्याचे हफ्ते पाडून देण्याचे काम सुरू आहे, एकंदरीत या सरकारचा व्यवहार पाहिला तर हे हफ्तेखोरांचे सरकार आहे की काय असे वाटायला लागले आहे, शेतकऱ्यांच्या महाविकास आघाडी सरकार मधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घोषित केले होते की शेतकऱ्यांना १००% वीजबिल माफी करण्यात येईल व घरगुती वापर असलेल्या ग्राहकांना १०० युनिटवर ३०% वीजबिल माफी करू.

प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी न करता क्रूरपणे कोरोना काळातील थकबाकीदार शेतकरी, व्यापारी यांना कोणतीही लेखी सूचना न देता वीज तोडणी सुरू आहे हा शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांवर अन्याय आहे, या सरकारने हा मनमानीपणा व जुलूम तातडीने थांबवावा अशी मागणीही माळशिरसचे भाजपा आमदार राम सातपुते यांनी यावेळी बोलताना केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.