Friday, June 2, 2023

रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; म्हणाले की मला कोणत्या तरी गुन्ह्यात अडकवायच अन्…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासाहित ११ जणांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राजकारण पुन्हा एकदा तापलं असून रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला आहे.

माझ्यावर गुन्हे दाखल करुन मला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवलं पाहिजे असा इशारा उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील पोलीस आयुक्तांना दिला. महाराष्ट्रातील कोणत्या विषयावर कोणी काही बोललं तर त्याला अडकवायचं, फसवायचं, अटक करायची असा प्रकार सुरु आहे. महाराष्ट्रात गेलो तर अटक करुन जेलमध्ये टाकतील असे मला पोलिसांचे फोन येत आहेत,” असं रवी राणा यांनी यावेळी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर संजय राऊतांवरही 506 चा गुन्हा दाखल करा असं थेट आव्हान रवी राणा यांनी यावेळी दिलं. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे, अनिल परबच्या प्रॉपर्टींवर कारवाई होईल, आणि मीही पुरावे देईन, असे आरोप आमदार रवी राणा यांनी केले आहेत.