हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत 300 घरे बांधणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत आमदारांना मोफत घरे देणार नसून त्यांच्याकडून 70 लाख रुपये घेणार असल्याचे सांगितले
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हंटल की, आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+ बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2022
तत्पूर्वी, सरकारने आमदारांना घरे बांधून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांनी सरकार वर टीका केली. मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त करत सरकार वर टीका केली. आमदारांना मोफत घरे कशासाठी? त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा” असं राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे