मुंबई । सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर मात्र, हिंदी सिनेसृष्टीत कलाकारांवर कसा अन्याय होतो. घराणेशाही कशी चालते या अशा सगळ्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत काही बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामध्ये कलाकारांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशी काही वृत्त प्रसारित करण्यात आली. दरम्यान, या सगळ्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत भूमिका मांडली आहे.
ज्यामध्ये सुशांतच्या आत्महत्येमुळे निर्माण झालेल्या वादाचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा किंवा पक्षाच्या कुठल्याही शाखेचा काहीही संबंध नाही असं ट्विटवर एक पत्र पोस्ट करत स्पष्ट केलं आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर उसळलेल्या वादानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंची या वादावरची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर उसळलेल्या वादावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं कि,” “सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला आहे. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्याही काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी इथे स्पष्ट करु इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद”.
#राजठाकरे #मनसेभूमिका #HindiFilmIndustry #SushantSinghRajput #MNS #RajThackeray pic.twitter.com/pUD1boTnSO
— Raj Thackeray (@RajThackeray) July 4, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”