मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मोदींना पत्र ; केल्या या मागण्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वेगाने वाढते आहे. तसेच राज्यात आज(14 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हंटले आहे की,’ कोविड ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे आर्थिक-सामाजिक पडसाद आपण देशभर पडलेले अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राजाला पुरेशा लसी मिळत नसतील तर पर्याय तरी काय उरतो? असा सवाल राज ठाकरे यांनी मोदींना लिहलेल्या पत्रातून उपास्थित केला आहे.

तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाच महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

  1. महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी

2. सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी

3. राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी

4. लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉपकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी.

5. राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती.

अशा पाच प्रमुख मागण्या त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्या आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment