आदित्य ठाकरे “पक्ष नसलेला” माणूस झाले; मनसेने उडवली खिल्ली

aditya thackeray raj thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आम्हीच खरी शिवसेना असा दावाही सातत्याने शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या या सध्याच्या एकूण सर्व परिस्थिती वरून मनसेने आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे आज पक्ष नसलेला माणूस झले आहेत असा टोला मनसेने लगावला आहे.

मनसेने आपल्या अधिकृत फेसबुक अकॉउंट वर पोस्ट करत म्हंटल आहे, नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! असा टोला मनसेने लगावला आहे तसेच शिल्लकसेना असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आदित्य ठाकरे सातत्त्याने मनसेला टाईमपास टोळी म्हणत हिणवत होते. मनसे हा संपलेला पक्ष आहे. भाजपाची सी टीम म्हणून मनसेला थोडं काम मिळालं आहे. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं,” असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. तसेच संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.