मनसे लढविणार स्वबळावर निवडणूका; बाळा नांदगावकरांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या नवीन घरी भेट दिली. तसेच दोघांमध्ये आघामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चाही झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. आगामी महापालिकांच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढविणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी महापालिका तसेच पालिकांच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, येत्या काही दिवसात राज्यातील 15 महानगर पालिका आणि नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवथीर्थ बंगल्यावर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे नांदगावकर यांनी सांगितले.

दि. 6 डिसेंबरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याला जाणार असून त्या ठिकाणी ते पुण्यात पदाधिकारी बैठक घेणारे आहेत. राज ठाकरे दौऱ्याला जाऊन आल्यावर नेतेमंडळी बैठका घेणार आहेत. आतापर्यंत सगळ्या निवडणूक आम्ही एकला चलो रे भूमिकेतून घेतल्या. राज ठाकरे पुढे निर्णय घेतील. मात्र, काही दिवसात एखादी गोड बातमी ऐकायला मिळू शकेल, असेही नांदगावकर यांनी सांगितले.

You might also like